स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविणाऱ्या विजाभज मुला-मुलींसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांना (आश्रमशाळांना) सहाय्यक अनुदान
• उद्दिष्ट:
१. भटक्या विमुक्तजातीच्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत.
२. विजाभज मुला-मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी.
३. विजाभज मुलांमुलींमधील शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
४. विजाभज मुला -मुलींचा शैक्षणिक सामाजिक तसेच सर्वांगीण विकास घडावा.
• अटी व शर्ती
१) विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२) लाभधारक मुलगा /मुलगी विजाभज विमाप्र प्रवर्गातील असावी.
३) लाभधारक मुलगा /मुलगी वय वर्ष ६ ते 14 वयोगटातील असावेत.
४) स्वयंसेवी संस्था ही सोसायटी ॲक्ट 1960 व सार्वजनिक विश्वस्त कायदा अधिनियम १850 अन्वये नोंदणीकृत असावी.
५) संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेली नसावी.
६) संस्था आश्रमशाळा चालविण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी.
• लाभाचे स्वरूप:
१) विजाभज, मुला- मुलींची मोफत भोजन व निवास व्यवस्था शाळा संकुलात केली जाते.
२) प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची भांडी, अंथरूण-पांघरूण मोफत दिले जाते.
३) आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थेत शासन मान्यता मिळाल्यानंतर खालील बाबींवर अनुदान अनुज्ञेय होते.
अ) वेतन :मान्यता प्राप्त कर्मचाऱ्यांसाठी १००%
ब) परीरक्षण:दरमहा दरडोई मान्य निवासी विद्यार्थ्यांसाठी रु. 900/- प्रमाणे प्राथमिक शाळेत ११ महिन्यांसाठी व माध्यमिक शाळेत १० महिन्यांसाठी.
क) इमारत भाडे : -सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या भाड्याच्या 75%
ड) वेतनेत्तर अनुदान : -प्राथमिक आश्रमशाळेसाठी निवासी विद्यार्थ्यांवरील मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनाच्या ८% माध्यमिक आश्रमशाळेसाठी 12% या प्रमाणात अनुज्ञेय होते.
इ)इमारत बांधकाम अनुदान :- निधीच्या उपलब्धतेनुसार प्राथमिक आश्रमशाळेसाठी रु.३.०० लक्ष व माध्यमिक आश्रमशाळेसाठी रु. ५.०० लक्ष.
•संपर्क :
१) संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
२) संबंधित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक.