BACK
HOME

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृहे सुरू करणे

राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना महानगरात शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच इतर प्राधिकरणात नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत. नोकरीच्या निमित्ताने अनेक मागासवर्गीय महिलांना मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात यावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त शासकीय, निमशासकीय, खाजगी इत्यादी प्राधिकरणात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मुंबई, पुणे व नागपुर येथे प्रत्येकी एक शासकीय वस्तीगृह सुरू करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय क्र. सान्यावि- 2015/प्र.क्र.९८/ बांधकामे, दिनांक ७ जानेवारी २०१६ अन्वये घेण्यात आलेला आहे. सदर वस्तीगृहात महिलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येऊन या प्रवेशित महिलांना कॉट,आंथरूण - पांघरूण इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. सदर वसतीगृहाच्या इमारतीत तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी आवश्यकतेनुसार वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या वसतीगृहाच्या इमारत परिसरात प्रवेशित महिलांना वाहने ठेवण्याची सोय असेल. या वसतीगृहात ग्रंथालयाची सोय करण्यात येणार आहे. या वसतीगृहात कॅरमबोर्ड, बुद्धिबळ व इतर इनडोअर क्रीडा साहित्य पुरविण्यात येईल.

सदर वसतिगृहातील प्रवेश पुढील अटींवर करण्यात येत आहे.
१) अर्जदार महिला महाराष्ट्र ची रहिवासी असावी.
२) अर्जदार महिला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ या वर्गवारीतील असावी.
३) अर्जदार महिला ज्या ठिकाणी नोकरी करीत असेल, तेथील सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले नेमणुकीच्या /बदलीच्या आदेशाची प्रत रुजू झाल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.
४) अर्जदाराची जवळचे नातेवाईक उदा. आई,वडील, पती हे संबंधित महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत रहात नसावेत.
५) अर्जदार नोकरी करणाऱ्या महिलेचे मासिक उत्पन्न रु. 30,000/- पेक्षा जास्त नसावे.
६) काम करणाऱ्या महिला जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत या वसतीगृहात राहण्याची मुभा राहील त्यानंतर वसतीगृह सोडणे अनिवार्य राहील.
७) वसतीगृहात प्रवेश घेतेवेळी रुपये रु. 5000/- इतकी अनामत रक्कम म्हणून वसतीगृहाच्या व्यवस्थाकांकडे जमा करावी लागेल. संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे वसतीगृहप्रवेशाची कार्यवाही करतील.