समाज कल्याण संस्थाना अनुदाने (समाजकार्य महाविद्यालय)
• उद्दिष्ट:
• स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या शासन मान्य विद्यापीठाशी सलग्न असणाऱ्या व शासनाची मान्यता असणाऱ्या समाजकार्य विषयाच्या पदवी -पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता व अनुदान ही योजना सन १९६६ पासून कार्यान्वित आहे.
• शासन निर्णय क्र. एमएसडब्लु-१४६४-७३०२७-ब, दिनांक २७.१२.१९६६ व दि. २० मे, १९७६ अन्वये समाजकार्य करणाऱ्या शाळांना / संस्थांना मान्यता व अनुदान देण्यासंबंधी नियमावली लागू करण्यात आली आहे.
• स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या समाजकार्य महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीमध्ये एक वाक्यता / सुसुत्रीकरण आणणे, प्रशासकीय नियंत्रण ठेवणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व प्रशिक्षित मनुष्यबळाच्या विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोग करणे. सद्यस्थितीत राज्यात एकूण 51 समाजकार्य महाविद्यालये कार्यरत असून, त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
|
अ.क्र.
|
समाजकार्य महाविद्यालय
|
अभ्यासक्रम
|
|
1.
|
अनुदान तत्वावरील महाविद्यालये -५०
|
बी.एस.डब्लु - ०३
|
|
2.
|
विना अनुदान तत्वावरीलमहाविद्यालये -0१
|
एम.एस.डब्लु - १३
बी.एस. डब्लु व एम.एस.डब्लु - ३५
|
राज्यात विभागनिहाय समाजकार्य महाविद्यालयांची संख्या खालील प्रमाणे :
• मुंबई - 1
• पुणे - 8
• नाशिक - 7
•अमरावती - 9
•नागपूर - 2
•औरंगाबाद - 18
•लातूर - 6
खालील अभासक्रम शिकवण्यात येतात :
१) प्रथम व द्वितीय वर्षात मास्टर ऑफ सोशल वर्क (जनरल)
२) महिला आणि बाल कल्याण समाजकार्य
३) वैद्यकीय आणि मानसोपचार समाजकार्य
४) शहरी आणि ग्रामीण समुदाय विकास समाजकार्य
५) मानव संसाधन व्यवस्थापन समाजकार्य
६) सुधारात्मक समाजकार्य
• लाभाचे स्वरूप
स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदान तत्वावरील समाजकार्य महाविद्यालयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता वेतन व वेतनेत्तर सहाय्यक अनुदान खालील सूत्रानुसार मंजूर करण्यात येते.
• मान्यताप्राप्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १००%वेतन अनुदान
• सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या रक्कमेच्या ७५% इमारत भाडे अनुदान
• वेतनेत्तर खर्चाकरिता वेतन खर्चाच्या ८% अनुदान.
• संपर्क :
१) संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
२) संबंधित समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य.