BACK
HOME

वैद्यकीय, तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय व अभियांत्रिकी व्यावसायिक पाठ्यक्रम असणाऱ्या महविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विध्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना

• उद्दिष्ट:
वैद्यकीय, अभियांत्रिकी,तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय, सि.ए.एम. बी.ए. व विधी अभ्यासक्रमाची पुस्तके महाग असल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थाना पुस्तके घेण्यामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून सन १९७८-७९ पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

• अटी व शर्ती :
१)विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असावा.
२) विद्यार्थी वैद्यकीय,तंत्रनिकेतन, कृषी, पशुवैद्यकीय, सि.ए.एम. बी.ए. व विधी अभ्यासक्रमात शिकत असणारा असावा.
३) विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.

• लाभाचे स्वरूप :
या अभ्यासक्रमासाठी २ विद्यार्थ्यामागे १ संच या प्रमाणे महाविद्यालयांना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.

अ.क्र. अभ्यासक्रमाचा तपशिल रक्कम
1. वैद्यकीय व अभियांत्रिकी रु. ७५००/-
2. कृषी रु. ४५००/-
3. पशुवैद्यकीय रु. ५०००/-
4. तंत्रनिकेतन रु. २४००/-
5. सी.ए., एम.बी.ए. आणि विधी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विध्यार्थ्यामागे १ संच रु. ५०००/-



• संपर्क :
1. संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त ,समाज कल्याण
2. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य .