BACK
HOME

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निवासी आश्रमशाळा

• उद्दिष्ट:
१. राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी.
२. ऊसतोड कामगारांसाठी मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत तसेच त्यांना शिक्षण, भोजन निवास एकाच छताखाली उपलब्ध व्हावे.

•अटी व शर्ती :
१. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. विद्यार्थी हा ऊसतोड कामगारांचा पाल्य असावा.

•लाभाचे स्वरूप :
१. प्रवेशित विध्यार्थ्यास मोफत निवास, शिक्षण व भोजन देण्यात येते. मोफत बिछानासाहित्य, क्रमिक पुस्तके, वह्या, शालेय साहित्य व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
२. आश्रमशाळा चालविल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति विद्यार्थी रुपये ९००/- प्रमाणे ११ महिन्यासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.
३. मान्यता प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा कर्मचाऱ्याच्या वेतनावर १००% अनुदान.
४. मान्य बाबीवरील खर्चासाठी शाळा व वसतिगृह विभागासाठी ८% आकस्मिक खर्चां करिता वेतनेत्तर अनुदान.
५. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाड्याच्या ७५% भाडे अनुदान.

•संपर्क :
१) संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
२) मुख्याध्यापक ऊसतोड कर्मचाऱ्यांचे मुलासाठी शाळा,