स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी अनुदानित आश्रम शाळांना सहाय्यक अनुदान
• उद्दिष्ट:
विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या आश्रमशाळा योजनेच्या धर्तीवर ज्या जिल्ह्यात साक्षरतेचेप्रमाण कमी आहे. अशा जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी आश्रमशाळा ही योजना सन १९९६-९७ पासून सुरू करण्यात आली आहे.
•स्वरूप :
• कर्मचारी वेतन:- शालेय व वसतिगृह कर्मचारी यांना १००% वेतन अनुदान
• परिपोषण अनुदान :- प्राथमिक आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांवर प्रति विद्यार्थी रु. ९००/- दरमहा ११ महिन्यांसाठी व माध्यमिक आश्रमशाळेसाठी १० महिन्यांकरिता स्वयंसेवी संस्थांना परिपोषण अनुदान देण्यात येते.
• इमारतभाडे:- इमारत भाड्यापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाड्याच्या ७५% भाडे संस्थेत देण्यात येते.
• आकस्मिक अनुदान :- शिक्षक व अधीक्षकांच्या एकूण वेतनाच्या १५ % रक्कम आकस्मिक व खर्च म्हणून देण्यात येते.
• सोयी सुविधा:- अनु. जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधे अंतर्गत वहया-पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, अंथरुण-पांघरूण, साबण, तेल, इत्यादी वस्तू पुरविण्यात येतात.
• अनु. जाती आश्रमशाळांची संख्या :- सद्यस्थिती राज्यात १० प्राथमिक व ९ माध्यमिक अशा एकूण १९ अनु. जाती अनुदानित आश्रमशाळा कार्यरत असून, त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.
•संपर्क :
संबधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद/ संबंधित अनु. जाती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक