महिला व बालकल्याण समिती
• उद्दिष्ट:
01. 7 वी ते 12 वी उत्तीर्ण मुलींना MS-CIT/ संगणक टायपिंग प्रशिक्षण देणं.
02. ग्रामीण महिलांना / मुलींना शिवणकाम प्रशिक्षण देणं.
03. ग्रामीण महिलांना /मुलींना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देणं.
04. कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार पुरवणं
05. अंगणवाडी केंद्रांना मॅट पुरवणं.
•अटी व शर्ती :
1 ते 3 उद्दिष्टांकरिता अटी व शर्ती
01. मान्यताप्राप्त संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करावा.
02. कमीतकमी 7 वी पास असावी.
03. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण रहिवासी असावी.
04. कुटुंब दारिद्रयरेषेखालील असावं किंवा उत्पन्न रुपये-1,20,000/- पर्यंत असावं.
05. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
चौथ्या उद्दिष्टाकरिता अटी व शर्ती :
01. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आहाराचा पूरवठा करण्यात यावा.
02. अंगणवाडी केंद्रात नोंदवलेल्या अनूसूचित जातीच्या कुपोषित बालकांना हा आहार देण्यात येईल.
पाचव्या उद्दिष्टाकरिता अटी व शर्ती:
01. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार मॅटचा पुरवठा करण्यात यावा
02. अंगणवाडी केंद्रास स्वत:ची इमारत असावी
03. 20 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी अनूसूचित जातीचे असावेत.
•संपर्क :
गटविकास अधिकारी, पंचायत समिती,
बाल विकास प्रकल्प अधिकारी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बा. वि.