डॉ. बाबासाहेव आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, (कृषी समृदृधी योजना)
• उद्दिष्ट:
1. नवीन विहिर पॅकेज 3,05,000/-
2. जुनी विहिर दुरुस्ती पॅकेज 1,05,000/-
3. शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज 1,35,000/-
• अटी व शर्ती :
1. लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.
2. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
3. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणं आवश्यक आहे.
4. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
5. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
6. या योजने अंतर्गत कमाल शेतजमिनीची अट6.00 हेक्टर आहे.
• लाभाचे स्वरूप:
अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळ्यांच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणाचा लाभ देणं.
• संपर्क :
1. कृषी विकास अधिकारी, जिल्हापरिषद, नागपूर
2. अर्ज प्रणालीचं स्वरूप ऑनलाइन असेल.